तंबाखू : आजच्या काळातला यमदूत

by | Oct 6, 2021

आज ३१ मे , जागतिक तंबाखू विरोधी दिवस .

भारता साठी ह्या दिवसाचे खूप महत्त्व आहे कारण भारत जगात तंबाखू सेवनात दुसऱ्या क्रमांकावर आहे . तंबाखू सेवना मध्ये धूम्रपान (बिडी,सिगरेट,हुक्का ) तसेच मिश्री ,गुटखा, जर्दा ,खैनी ,पानसुपारी सोबत खाल्ला जाणाऱ्या तंबाखू चा समावेश होतो .

तंबाखू आजच्या काळातला यमदूत ठरला आहे कारण –

  1. तंबाखू जगभरात दरवर्षी तब्बल ८ दशलक्ष मृत्यूंना कारणीभूत ठरतो
  2. तंबाखू वापरणाऱ्यांपैकी अर्धे लोक तंबाखू संबंधीत आजारांनी जीव गमावतात .
  3. तंबाखू सेवन करणाऱ्यांच्या आयुष्याची १० वर्षे कमी होतात.
  4. तंबाखू सेवन किंवा धूम्रपान यामुळे शरीरातल्या प्रत्येक अवयवावर दुष्परिणाम होतात मधुमेह , विस्मरण , पोटातील ulcer ,हृदयविकार , फुफ्फुसाचे आजार व अशा अनेक रोगांचा धोका वाढतो. तोंडामध्ये म्हणाल तर हिरड्यांचे विकार, दात ढिले पडणे , दातांवर डाग पडणे ह्या गोष्टी दिसून येतात
  5.  तंबाखू मुळे  तब्बल २० प्रकारचे कर्करोग होऊ शकतात .
6 . ओल्याबरोबर सुके ही जळते – धूम्रपानातून निर्माण होणारा धूर प्रदूषणाला कारणीभूत तर ठरतोच शिवाय passive स्मोकिंग , अर्थात हा धूर श्वासा वाटे शरीरात गेल्यामुळे धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तब्येतीवरही विपरीत परिणाम होतो . त्यांना कॅन्सर चाही धोका असू शकतो. धूम्रपान करणाऱ्यांच्या कुटुंबियांना श्वसनाचे विकार, दमा या आजारांचा सामना करावा लागू शकतो . जगात तंबाखूमुळे मरणाऱ्या 8 दशलक्ष लोकांपैकी 1दशलक्ष लोक passive स्मोकिंग मुळे मरतात यावरून याचे गांभीर्य लक्षात यावे

धूम्रपान व करोंना
धूम्रपान करणाऱ्यांमध्ये करोंनाचा धोका खूप पटीने वाढतो . धूम्रपान करणाऱ्यांना करोंना होण्याची शक्यता अधिक असते . तंबाखू व धूम्रपान रोगप्रतिकरक शक्ती कमी करतात तसेच फुफ्फुसांची क्षमताही कमी करतात त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना तीव्र स्वरूपाचा कोविड होण्याची , आयसीयू त जास्त दिवस राहावं लागण्याची , तसेच ऑक्सिजन ची गरज लागण्याची शक्यता खूप जास्त असते .
त्यामुळे करोंना च्या निमित्ताने का होईना या धोकादायक व्यसना बद्दल अधिक जागरूक होऊन त्याची संगत सोडणं ,हीच एका चांगल्या जीवनाची सुरुवात ठरेल .

या लेखात आपण तंबाखू ची काळी बाजू पहिली . तंबाखूच्या या व्यसनाच्या विळख्यातून सुटण्याचे फायदे व त्यासाठीच्या पद्धती बद्दल आपण पुढील भागात पाहू.

0 Comments