मैत्री दिवस

by | Oct 6, 2021

मागच्याच आठवड्यात फ्रेंडशिप डे अर्थात मैत्री दिवस होऊन गेला . माणसाच्या आयुष्यात चांगल्या मित्रांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मित्र जअसे माणसांचे आयुष्य सुखकर करतात,तसेच दातांचे काही चांगले मित्र अर्थात बेस्ट फ्रेंड्स असतात जे दातांना निरोगी ठेवण्यात, त्यांचे आयुष्य वाढवण्यात मदत करतात; त्यांची ओळख करून घेऊ..

१) टूथब्रश आणि टूथपेस्ट

टूथब्रश आणि पेस्ट ही जोडी दातांचं आरोग्य जपण्यास मदत करते

तुमचा टूथब्रश जर योग्य असेल तर तो तुमच्या दातांची निगा राखून दातांचे प्रॉब्लेम्स दूर ठेवतो..

कसा असावा तुमचा टूथब्रश?

दातां ना sensitivity चा त्रास नसेल तर शक्यतो ‘मीडियम” टूथब्रश वापरावा . तो दात नीट स्वच्छ करतो
टूथब्रश चे हेड शक्यतो छोटं असावं म्हणजे ब्रश तोंडातल्या शेवटच्या दातांपर्यंत सहज पोचतो.
टूथब्रश दर ३ महिन्यांनी किंवा त्याचे ब्रीसल्स (bristles ) जरा वाकडेतिकडे झाल्यावर लगेच बदलावा

टूथपेस्ट चा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे फ्लोराइड . मोठ्या माणसांच्या टूथपेस्ट मध्ये १००० ppm flouride असणं ही दातांसाठी फायदेशीर ठरतं .

याखेरीज टूथपेस्ट मध्ये बरेच घटक असतात , ताजेपणा साठी, चांगला फेस येण्यासाठी; हल्ली तर खूप आयुर्वेदिक घटक सुद्धा असतात.

पण हे लक्षात घेतलं पाहिजे की योग्य पद्धतीने नियमित २ वेळा ब्रश करणं हे या सर्व घटकांपेक्षा जास्त महत्वाचं… ब्रश चं महत्व ८०% असतं ; पेस्टचं काम फक्त २०% च असतं .

२) तुमचा दातांचा डॉक्टर अर्थात डेंटिस्ट

काही वेळा दातांची पुरेशी काळजी घेऊनही एखाद्या दातात कीड किंवा कॅव्हिटी सुरू होऊ शकते. पण सुरुवातीच्या अवस्थेत बऱ्याचदा त्याचा काहीच त्रास जाणवत नाही . दुखणं किंवा sensitivity अशी कुठलीच तक्रार नसते पण खरं म्हणजे या अवस्थेतच त्या बऱ्याचदा दाताचा सोप्या पद्धतीने , कमी वेळात व कमी खर्चात इलाज तर होतोच पण पुढचा त्रास दुखणं वगैरे सुद्धा टळतं . अश्या कॅव्हिटीस दातांच्या नियमित तपासणीत लक्षात येतात .

त्यामुळे त्रास झाल्यावरच दातांच्या डॉक्टर कडे जाण्याऐवजी नियमितपणे दर ६ महिन्यांनी जर दातांची तपासणी (चेक अप ) करून घेतलं तर नक्कीच तुमच्या आणि तुमच्या दातांसाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या डेंटिस्टला फक्त तुमच्या दातांचा डॉक्टर न समजता तुमच्या दातांचा मित्र समजा …

दातांचे अजूनही काही चांगले मित्र आहेत ;ज्यांची ओळख पुढील भागात….

0 Comments