म्युकॉर मायकोसीस (mucormycosis)आणि करोना एक अभद्र युती
हा अडथळा किती वेळ व किती प्रमाणात आहे तसेच त्या भागाला पर्यायी दुसरा पुरवठा आहे की नाही यावर त्या भागाच्या नुकसाना ची तीव्रता ठरते.
ही बुरशी चे बीजाणू नाका वाटे शरीरात प्रवेश करतात . निरोगी माणसांत त्यांना घाशाकडे ढकलू न पचनसंस्थेतून त्यांना बाहेर काढले जाते. निरोगी रक्ता मध्येही ह्या बुरशीला थारा दिला जात नाही.
मात्र प्रतिकरशक्ती कमी असल्यास नाका वाटे प्रवेश करून ही बुरशी sinuses , जबड्याचे हाड , डोळे व मेंदुपर्यंत ही पोचू शकते.
करोना आधी ह्या संसर्ग चा धोका खालील परिस्थितीत असे :-
1. अनियंत्रित मधुमेह
2 . प्रतिकरशक्ती कमी करणारे काही प्रकारचे रोग जसे काही प्रकारचे कॅन्सर , एड्स
3. अवयव प्रत्यारोपण किंवा प्रतिकरशक्ती कमी करणारी औषधे चालू असणे
2. रक्तातली वाढलेली साखर व अॅसिड ह्या बुरशीला वेगाने वाढण्यास मदत करतात. त्यामुळे अनियंत्रित मधुमेहींना ह्या संसर्गाचा धोका जास्त असतो.
3. करोना च्या उपचारामधे वापरली जाणारी स्टेरॉईडस ही प्रतिकरशक्ती कमी करतात च तसेच रक्तातली साखर ही वाढवतात
तसेच करोना उपचारासाठी वापरली जाणारी अजून ही काही औषधे प्रतिकरशक्ती कमी करतात करोना व त्याचे दुष्परिणाम थांबवण्यासाठी जरी ही गरजेचे असले तरी त्यामुळे कधी कधी ह्या बुरशीचे फावते .
वरील निष्कर्ष हे डॉक्टरां च्या सध्या च्या निरीक्षणां वरून काढलेले आहेत व या विषयावर अजूनही अभ्यास सुरू आहे व सखोल अभ्यासाची गरज ही आहे .
- डोके तसेच sinus चा भाग दुखणे
- चेहऱ्याचा भाग दुखणे
- नाक बंद होणे किंवा नाकातून रक्त मिश्रित
- पाणी येणे
- दात दुखणे किंवा दात अचानक हलू लागणे ,
- दाता जवळ सूज किंवा पू येणे
- टाळूवर काळा चट्टा किंवा ulcer
- डोळे दुखणे, लाल होणे
- धूसर दिसणे
त्यामुळे वरील पैकी कुठली ही लक्षणे आढळल्यास तातडीने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. ज्यात कान नाक घास (ईएनटी)विशेषज्ञ , डोळ्यांचे डॉक्टर , oral व maxillofacial surgeon किंवा physician चा समावेश होतो
वेळेत निदान व उपचार केल्यास हा रोग आटोक्यात ठेवता येऊ शकतो तसेच नुकसान ची तीव्रता ही कमी करता येते . परंतु जास्त उशीर केल्यास संसर्ग मेंदूत पोचून हा रोग जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे क्षुल्लक वाटली तरी वरील लक्षणांकडे दुर्लक्ष करणं धोकादायक ठरू शकतं . त्यामुळेच या संसर्ग बद्दल जागृती ही आवश्यक आहे.
हा आजार करोना रुग्णांना हॉस्पिटल मध्ये अॅडमिट असल्यापासून ते बरे झाल्यावरही दोन महिन्यां पर्यंत होऊ शकतो कारण करोना रुग्णां ची प्रतिकरशक्ती पुनः पूर्ववत व्हायला वेळ लागतो .
त्यामुळे करोना तून बरे झाल्या नंतरही रुग्णां नी धूळ व प्रदूषणाची ठिकाणे टाळणे तसेच N 95 मास्क वापरणे बंधनकारक आहे
तसेच रक्तातली साखरेची पातळी काटेकोरपणे नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.
-डॉ प्राजक्ता हळकुंडे

0 Comments