व्यसन मुक्तीकडे …
मागच्या भागात आपण तंबाखूचे दुष्परिणाम पाहिले , या भागात आपण या व्यसनातून बाहेर पडण्याबद्दल बघू ..
तंबाखूचे व्यसन सर्व सामाजिक थरांत खोलवर पसरलेले आहे, याचे मुख्य कारण
- तंबाखूच्या खरेदी, विक्री किंवा सार्वजनिक ठिकाणी वापरावर कायद्याने बंदी नाही
- तंबाखू सगळीकडे सहजपणे मिळतो
तंबाखू मधील निकोटीन हा व्यसनाला कारणीभूत ठरणारा मुख्य पदार्थ आहे. तंबाखू सोडताना शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर त्रास जाणवतो . तरीदेखील तंबाखूचे, तो सेवन करणाऱ्या व्यक्तीवर व समाजावर होणारे दुष्परिणाम बघता ही व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणे केव्हाही चांगले .
तंबाखू चे व्यसन सोडण्यासाठी अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सुचवलेल्या टिप्स खालीलप्रमाणे-
१. व्यसन सोडण्याचा दिवस आणि तारीख ठरवा
- या दिवसाबद्दल सर्वांना सांगा
- सर्व सिगारेटस , तंबाखू, गुटखा पाकिटे फेकून द्या
- या दिवशी स्वतःला busy ठेवा
- व्यसनी लोकांची संगत टाळा
- भरपूर पाणी,सरबत वगैरे द्रव पदार्थ प्या
२. NRT अर्थात निकोटीन replacement थेरपी
कमी प्रमाणात निकोटीन असणारे chewing gum , patch ,स्प्रे यांचा यात समावेश होतो. ह्यांच्या वापरामुळे निकोटीन किंवा तंबाखू थांबवल्यामुळे दिसणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासांचे प्रमाण कमी होते , तसेच
तंबाखूची तल्लफ कमी होण्यास ही मदत होते
तंबाखूची तल्लफ कमी होण्यास ही मदत होते
३. औषधे
डॉक्टरांच्या सल्ल्याने Bupropion , किंवा Varinicline अशी काही औषधे घेतंतली जाऊ शकतात.
४. मानसिक आधार
support group (मदत गट ) किंवा तज्ञांचे मार्गदर्शन हे ह्या व्यसना शी लढायला मानसिक पातळीवर मदत करतात . मदत गटामध्ये व्यसंन मुक्तीसाठी प्रयत्न करणारे तसेच या व्यसनातून यशस्वीपणे बाहेर पडलेल्यांचा समावेश असतो
५. पर्यायी उपचारपद्धती
यात योग ,ध्यान ,accupuncture , संमोहन यांचा समावेश होतो.

0 Comments