पडणारच तर
आहेत ना …भाग 2
मागच्या भागात आपण पाहिलं की, ६ वर्षांची सानवी तिच्या अख्ख्या कुटुंबासोंबत दुखऱ्या दाताची तक्रार घेऊन आली होती
आणि तिच्या आई चा प्रश्न होतं की, “एवढ्या लहान वयात तिचे दात एवढे कसे खराब झाले?”
आता बघूया पुढे काय झालं ..
मी विचारलं, “सानवीचे आजी आजोबा, तुम्ही लहानपणी मधल्या वेळी काय खात होतात?”
” लाह्या, मुरमुरे, शेंगदाणे, फुटाणे, पेरू ,बोरं….” लगेच आजोबांचे उत्तर आलं .
“लाडू किंवा चिवडा” आजींनी पण त्या उत्तरात भर घातली.
“आणि आता सानवी काय खाते?” मी विचारलं
“तिला काय?…. बिस्किट, डोनट, पेस्ट्री, चॉकलेट, वेफर्स…. हे असंच लागतं मधल्या वेळी… किंवा मग पास्ता, पाणीपुरी असं चमचमीत लागतं…”
“आता तुम्हीच सांगा सानवीची आई, दातांचं महत्त्वाचं काम आहे खाणं चावण्याला मदत करणं .. आणि आपलं खाणंच मागच्या काही वर्षात किती बदलून गेलं आहे? मला सांगा आजी आजोबा, तुम्ही जे खायचा ते पौष्टिक तर होतंच पण ते खाताना दातांचाही व्यायाम व्हायचा.आताचं खाणं ज्याला जंक फूडम्हणतात…ते पौष्टिक तर नाहीच आणि एकदम मऊ आहे जे चावायला दातांना फारसे कष्ट पडत नाहीत. आणि दातातल्या जंतूंचं ते पण ते आवडतं खाणं आहे… त्यामुळे हल्ली लहान वयात भरभर दात किडतात.”
“हो ,मी या मुद्द्याकडे येणारच होते; रात्री ब्रश करणं सकाळी ब्रश करण्यापेक्षा जास्त महत्वाचं असतं ; कारण दिवसभर खाल्लेलं सगळं अन्न व त्यामुळे जमा झालेले जंतू रात्रभर तोंडात तसेच राहतात व लवकर दात किडतात. त्यामुळे रात्री ब्रश करणे हे रात्री जेवण्या एवढंच महत्त्वाचं आहे.
रात्रीचा नियमित ब्रश आणि दर सहा महिन्यांनी नियमित डेंटल चेकअप ठेवला तर दात चांगले राहण्यास मदत होते”
पुढच्या काही दिवसांमध्ये सानवी च्या दातांची ट्रीटमेंट पूर्ण करण्यात आली .
त्याचबरोबर तिच्या खाण्याच्या सवयी व ब्रशिंग यामध्ये चांगले बदल घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जेणेकरून तिला भविष्यात दातांच्या समस्या कमी जाणवतील.
खाण्याच्या बाबतीतले चांगले बदल कुठले याबद्दल पुढच्या भागात …
लेखातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत पण लेख सत्य परिस्थितीवर आधारित आहे…

0 Comments