पडणारच तर

आहेत ना …भाग ३

पडणारच तर आहेत ना …

 

मागच्या भागात आपण सानवी चे ट्रीटमेंट पूर्ण झाली हे बघितलं. ट्रीटमेंट चालू असतानाच आम्ही सानवीच्या काही वाईट सवयी , ज्या तिचे दात लवकर कीडवण्यासाठी कारणीभूत होत्या त्या बदलण्याचा प्रयत्न केला.
त्या वाईट सवयीं बद्दल या भागात जाणून घेऊ:-

 

 

 

 1)अधून मधून सतत खात राहणे
सानवी सकाळ नाश्ता किंवा जेवणाच्या वेळी पोटभर खायची नाही ;आणि मग मधल्या वेळात सतत काहीतरी बिस्किट, चिप्स असं जंक फूड मागायची किंवा मध्ये मध्ये असं सारखं काहीतरी खाण्यामुळे तिला जेवताना भुक नसायची आणि मग ती पोटभर जेवायची नाही. अधून- मधून सतत खाण्यामुळे तोंडातल्या जंतूंना सतत खाद्य मिळत राहतं;त्यामुळे दात किडण्याची प्रक्रिया खूप लवकर होते.
सानवी च्या आई-बाबांना तिचा अधून-मधून खाणं हळूहळू कमी करायला लावून दिवसातून तीन ते चार वेळा व्यवस्थित तिला पोटभर खायला लावण्याचा सल्ला देण्यात आला
आणि तरीपण तिने अधून-मधून खायला मागितलं तर दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगण्यात आलं
अ) खाल्यानंतर व्यवस्थित चुळा भरणे आणि
ब) मधल्या वेळी खाण्यासाठी जंक फूड ऐवजी काकडी, गाजर किंवा सुकामेवा किंवा फळं असे पर्याय देण्यात आले

 

 2)जंक फूड आणि गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाणे
आपल्याला जसे गोड (जसे बिस्किटं, केक)आणि जंक फूड म्हणजे मैदा, बटाटा जास्त प्रमाणात असलेले पदार्थ (जसे नूडल्स, चिप्स) हे पदार्थ आवडतात. तसेच ते जंतूंनाही आवडतात त्यांचं पटकन विघटन होऊन ॲसिड तयार होते व हे ॲसिड दात किडायला कारणीभूत ठरते आणि आणि हे सर्व पदार्थ पौष्टिक अजिबात नसतात. त्यामुळे चांगल्या तब्येतीसाठी आणि चांगल्या दातांसाठी हे पदार्थ टाळलेलेच चांगले.

 

3) रात्री ब्रश न करणे
रात्री ब्रश केल्यामुळे दिवसभरात दातांवर जमा झालेले अन्नकण आणि त्यावर वाढलेले जंतू हे सर्व निघून जातात व दातांचं किडण्या पासून संरक्षण होतं ; हे सानवी व तिच्या आई-बाबांना व्यवस्थित समजावण्यात आलं.

तसेच सानवी आठ ते दहा वर्षां ची होईपर्यंत घरातल्या मोठ्या माणसांनी तिचा ब्रश करून घेणे हे गरजेचे आहे हेही समजावण्यात आले 

 

 

 

 

लेखातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत पण लेख सत्य परिस्थितीवर आधारित आहे…

 

0 Comments