टुथ फेअरी आणि इतर दंतकथा

by | Mar 2, 2022

 

 

 

 

 

 माझा चार  वर्षाचा मुलगा बिल्डिंगमधल्या इतर मुलांशी खेळत होता तेव्हा समोरचे दुधाचे दात पडलेल्या एका सहा- सात वर्षाच्या त्याच्या मैत्रिणीला तो म्हणाला की “माझ्या आईकडे दात बसवायला ये”  हे ऐकून मला खूप हसू आलं

दुधाचे दात पडून नवीन दात येणे ही लहान मुलांच्या सहाव्या सातव्या वर्षापासून ते बाराव्या वर्षापर्यंत चालू असलेली नॉर्मल प्रक्रिया असते व त्यांच्या वाढीतला महत्त्वाचा टप्पा सुद्धा असतो

दुधाचे दात पडण्याच्या या घटने कडे वेगवेगळ्या संस्कृती मध्ये देशांमध्ये कशा पद्धतीने बघितलं जातं याचा एक मजेशीर आढावा आपण या लेखातून घेऊया…

 

 

१) भारत आणि श्री लंका 

आपल्या भारता पासूनच करूया माझ्या आईने माझा पहिला पडलेला दुधाचा दात मला तुळशीच्या कुंडीत फेकायला सांगितला होता जेणेकरून नवा दात चांगला यावा
अशीच प्रथा भारतातल्या या विविध भागांमध्ये आढळते ज्यात पडलेला दुधाचा दात हा बागेत शिकायला किंवा जमिनीत पुरायला मुलांना सांगितला जातो जेणेकरून बागेत किंवा जमिनीतून नवीन रोप जसा छान उगवतं तसाच नवीन दातही यावा अशी या मागची भावना असावी

आपला शेजारी देश श्रीलंकेमध्ये एक वेगळी प्रथा आढळते ज्यात हातात घराच्या छतावर ती मुलांना फेकायला सांगितला जातो व अशी धारणा आहे की आर खार आज जुना दात घेऊन जाऊन नवीन चांगला दात देईल तशा अर्थाचं गाणं देखील मुलांना म्हणायला सांगितलं जातं

 २)दक्षिण अमेरिका 

श्रीलंकेतल्या या खारीची ची जागा स्पेन व अर्जेंटिना मेक्सिको अशा बऱ्याच दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये उंदीर घेतो मुलांना रात्री असा पडलेला दुधाचा दात उशीखाली किंवा एक पेलाभर पाण्यात ठेवायला सांगितला जातो आणि रात्री पेरेझ नावाचा एक दातांचा ऊंदिर हे पाणी पितो आणि दात घेऊन जातो व त्या बदल्यात एक गिफ्ट ठेवतो
एल साल्वादोर या देशात हे काम काम उंदरा ऐवजी एक ससा करतो

 

 

 

 

 

 

माझ्या मते, उंदीर ,खार, ससा ही प्रतिक मुद्दाम वापरली गेली असावीत कारण हे तिन्ही प्राणी त्यांच्या मजबूत दातांसाठी प्रसिद्ध आहेत आपल्या मुलांचे नवीन येणारे दात सुद्धा असेच मजबूत असावेत अशी भावना त्यामागे असावी

प्राण्यांची गोष्ट चालूच आहे तर ब्राझील मध्ये या प्राण्यांची जागा एक पक्षी घेतो ब्राझीलमध्ये असा मानतात की मुलांनी उंच फेकलेला खराब दुधाचा दात एक पक्षी पकडून घेऊन जातो

 

३)अमेरिका व युरोपीय देश

अमेरिका, कॅनडा ,ऑस्ट्रेलिया ,युरोपातल्या बऱ्याच देशांमध्ये मुलांना
टूथ फेरी नामक परीची गोष्ट सांगितली जाते जी उशी खालचा दात घेऊन जाऊन त्याऐवजी भेट देऊन जाते

 

 

 

 

 

 

 

 एकूणच काय तर व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने देश तेवढ्या दुधाच्या पडलेल्या दाता बद्दलच्या गोष्टी किंवा दंतकथा…
कदाचित आपल्या शरीरातल्या या नव्या बदलांचे मुलांनी आनंदाने स्वागत करावा म्हणून या दंतकथा रचल्या गेल्या असतील
आशा करते की तुम्हालाही ही दंत कथांची रंजक सफर आवडली…

0 Comments