डेन्टल टुरिझम
एन आर आय नातेवाईक भारतात आले की त्यांची कामाची लिस्ट तयार असते.
त्यात तिकडे न मिळणाऱ्या किंवा आईच्या हातच्या पदार्थाचा आस्वाद घेणे, नातेवाईकांच्या भेटी , कुलदेवतेचे दर्शन, शॉपिंग अशा गोष्टींचा समावेश असायचा.
आता या लिस्ट मधे अजून एक गोष्टीचा समावेश झाला आहे ; ती म्हणजे … “दातांची ट्रीटमेंट”
बरेच विदेशातील पर्यटकसुद्धा देश फिरण्याबरोबर दातांची ट्रीटमेंट सुद्धा करून घेणे प्लान करतात.
मेडिकल टुरिझम म्हणजे एखादे ऑपरेशन किंवा एखादी ट्रीटमेंट विदेशात करून घेणे.तसेच एखाद्या देशातील पर्यटनासोबत आता डेंटल टुरिझम सुद्धा वाढीस लागला आहे.
याचे पहिले कारण म्हणजे,
1) ट्रीटमेंटचा कमी दर –
भारत किंवा दक्षिण अमेरिकेतले बरेच देश किंवा युरोपातले काही देश इथे डेंटल ट्रीटमेंटचा दर हा यूएस, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इथल्या दरांपेक्षा कमी असतो . जमिनीचे, कच्च्या मालाचे भाव किंवा शिक्षणाचा खर्च हा भारत किंवा मेक्सिको ,कोलंबिया अशा दक्षिण अमेरिकेतील देशात तुलनेने कमी असल्यामुळे हा फरक पडतो ; तसेच डॉलर किंवा युरो च्या मानाने या देशातील चलनाचा दर कमी असल्यामुळे पण हा फरक पडतो
2)दुसरे कारण म्हणजे आता भारतासारख्या देशात देखील दातांची ट्रीटमेंट सर्व आधुनिक व नवीन तंत्रज्ञान व इक्विपमेंट वापरून केली जाते तसेच डॉक्टर देखील सतत नव्या तंत्रज्ञानासोबत स्वतःला अपग्रेड करत राहतात; त्यामुळे परदेशातल्या तोडीची ट्रीटमेंट इथेही मिळू शकते.
शिवाय भारतात इंग्लिश भाषा हे बऱ्याच ठिकाणी समजली आणि सफाईदारपणे बोलली जाते त्यामुळे भाषेची अडचण बऱ्याच पर्यटकांना जाणवत नाही.
तसेच भारत हा देश पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा समृद्ध आहे त्यामुळे पर्यटन आणि ट्रीटमेंट असे एका दगडात दोन पक्षी सुद्धा परदेशी नागरिकांना मारता येऊ शकतात दोन अपॉइंटमेंट मधल्या दिवसांमध्ये एखाद्या सुंदर स्थळाला भेट देता येऊ शकते, योगा शिबिराला हजेरी लावली जाऊ शकते.
भारतासोबतच मेक्सिको, मलेशिया हंगेरी, पोलंड, चिली , कोलंबिया, क्रोएशीया हे देशसुद्धा डेंटल टुरिझम साठी प्रसिद्ध आहेत.
डेंटल टुरिझमचे तोटे म्हणजे परत आपल्या मूळ देशात गेल्यावर जर दातांशी संबंधित एखादी समस्या उद्भवली तर तेवढ्या अशा गोष्टीसाठी परत येणे शक्य नसते.
अशा विदेशातील क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट घेण्याआधी डॉक्टरांचे कौशल्य तसेच क्लिनिकमध्ये योग्य ती स्वच्छता काटेकोरपणे पाळली जाते की नाही याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

0 Comments