Y-ब्रश
.नवीन वर्षामध्ये एका नवीन पद्धतीच्या टूथब्रश बद्दल माहिती घेऊया
Y ब्रश किंवा माऊथ पीस टूथब्रश :-
हा नेहमीच्या इलेक्ट्रिक टूथब्रश सारखेच काम करतो पण फरक आहे तो फक्त त्याच्या आकारामध्ये…..
या टूथब्रशचा आकार हा इंग्लिश मधल्या ” वाय”(y ) अक्षरासारखा असतो. त्याचा अर्धगोलाकार भाग, जो आपल्या जबड्यावर फिट बसतो, त्यात हजारो नायलॉन ब्रिसल्स असतात . हे ब्रिसल्स 45° कोनात दातांवर adjust होतात , व बटन दाबल्यावर हे ब्रिसल्स व्हायब्रेट होतात व आपल्या दातांची स्वच्छता करतात.
आपल्याला फक्त ब्रशचे हँडल पकडून थोडसं उजवीकडे व डावीकडे ब्रश ला हलवावे लागते
एका जबड्यातल्या सर्व दातांना हा ब्रश एकाच वेळेला स्वच्छ करतो
उदाहरणार्थ- वरच्या दातांना ब्रश केल्यावर हा ब्रश खालच्या दातांवर ठेवायचा मग खालचे सर्व दात एकदम स्वच्छ होतात.
त्याचा फायदा असा होतो की आपला नेहमीचा ब्रश करायला आपल्याला दोन मिनिटे लागतात. एका दातावरती साधारण पाच ते दहा सेकंद ब्रश वापरला जातो ;
पण वायब्रश मात्र वरच्या दातांना ब्रश करायला पाच सेकंद व खालच्या जाताना ब्रश करायला पाच सेकंद एवढा कमी वेळ घेतो.
फायदे –
1) ब्रशींगला लागणारा वेळ खूपच कमी म्हणजे 10 सेकंद
2) वयस्कर लोक किंवा असे लोक ज्यांना काही आजारपणामुळे ब्रश करणे व्यवस्थित जमत नाही अशांसाठी हा ब्रश फायदेशीर ठरू शकतो
तोटे-
1) हा ब्रश दातांची स्वच्छता चांगली करतो पण दातांची ठेवण जरा वेगळी असेल किंवा दात वेडेवाकडे असतील तर या ब्रशच्या फिटिंग मध्ये आणि दातांच्या स्वच्छते वर परिणाम होऊ शकतो.
2) तसेच ब्रश झाल्यानंतर ब्रशमधली पेस्ट व्यवस्थित स्वच्छ धुणे देखील जरा जिकिरीचे असते
(सर्व माहिती व फोटो , गूगल वरुन साभार )

0 Comments