13 ऑगस्ट – जागतिक डावखुऱ्या लोकांचा दिवस

by | Aug 12, 2023

13 ऑगस्ट हा ‘जागतिक डावखुऱ्या लोकांचा दिवस’ म्हणून ओळखला जातो. जगात असं म्हटलं जातं की, जवळपास दहा टक्के लोक हे डावखुरे आहेत. उजवा हात प्रामुख्याने वापरणारे लोक बहुसंख्य असल्यामुळे बऱ्याच वस्तू किंवा सोयीसुविधा या त्यांच्या सोयीनुसार बनवलेल्या असतात ; ज्या डावखुऱ्या लोकांना कधी कधी अडचणीच्या ठरू शकतात.
 
 
 
 
उदाहरणच द्यायचं झालं तर,  साधी रोजच्या वापरातली कात्री किंवा फ्रिजच्या  दाराचे हँडल या गोष्टी उजवा हात वापरणाऱ्यांच्या सोयीनुसार बनवलेल्या असतात .
पण डावखुऱ्या लोकांच्या या अडचणी बऱ्याचदा बहुसंख्य उजवा हात वापरणाऱ्यांच्या गावीही नसतात.
 
 
 
 
 
 
माझंच उदाहरण घ्या ना …

मी एकदा कॉलेजमध्ये असताना एकदा दुसऱ्या डिपार्टमेंट मध्ये गेले होते , तेव्हा माझ्याच वर्गातली एक मुलगी मला डेंटल चेअर च्या डाव्या बाजूला बसून काम करताना दिसली. (आम्ही जनरली पेशंटच्या आणि चेअरच्या उजव्या बाजूला बसून काम करतो) तिला बघून मी सहज कोणालातरी म्हटलं “ही इथे का बसली आहे?” त्यावर मला उत्तर मिळालं “अगं,ती लेफ्टी आहे ना …”

डेंटल क्लिनिक मध्ये सगळ्यात महत्त्वाची ,आवश्यक गोष्ट म्हणजे ‘डेंटल चेअर’.. तिची रचना ही उजव्या बाजूने काम करण्याच्या दृष्टीने केलेली असते.,डेंटल चेअर प्रमाणेच डेंटल क्लिनिक आणि बऱ्याच इन्स्ट्रुमेंट्सची रचना तसेच क्लिनिक मधल्या सोयी सुविधा या उजवा हात प्राधान्याने वापरण्याच्या दृष्टीने बनवलेल्या असतात अशावेळी लेफ्टी डेंटिस्ट ना कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो ?

लेफ्टि डेंटिस्ट ना डेंटल चेअरच्या डाव्या बाजूला काम करावे लागते जिथे जवळच पेशंटला थुंकण्या  साठीचे छोटे बेसिन असते.लेफ्टी डेंटिस्ट साठी वेगळी  रचना असलेली डेंटल चेअर सुद्धा असते पण डेंटिस्ट जिथे शिक्षण घेतात त्या डेंटल कॉलेज मध्ये बऱ्याचदा अशी वेगळी चेअर उपलब्ध नसते.माझ्या एका लेफ्टी डेंटिस्ट मैत्रिणीचा अनुभव होता की, त्यांच्या कॉलेजमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला एक अशी चेअर उपलब्ध होती पण तिच्या वर्गात दोन लेफ्टी विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या पैकी एकाला

 

 
 ऍडजेस्टमेंट करावी लागायची. तसेच अशा मुलांना प्रोफेसरच अशी शिकवण द्यायचे की, ” बाहेर गेल्यावरती तुम्ही जेव्हा डेंटल क्लिनिकमध्ये जॉब शोधाल तेव्हा तुम्हाला अशी वेगळ्या पद्धतीची चेअर मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच्या डेंटल चेअर वरती ऍडजेस्टमेंट करून काम कसं करायचं याची प्रॅक्टिस कॉलेजमध्येच करून घ्या “
तसेच बऱ्याचदा स्वतःच्या क्लिनिकमध्ये सुद्धा अशी लेफ्टी चेअर    ठेवणे डेंटिस्टना जमत नाही कारण, क्लिनिक मध्ये येणारे स्पेशालिस्ट किंवा असोसिएट डेंटिस्ट हे लेफ्टी असतीलच असं नाही.या समस्येला पर्याय म्हणून डेंटल चेअर च्या  दोन्ही बाजूंनी काम करता येईल अशा लवचिक ॲम्बीडेक्सट्रस  चेअर उपलब्ध आहेत पण त्यासाठी डेंटल क्लिनिकच्या जागेची रचना देखील पूरक असली पाहिजे, जिथे डेंटल चेअरच्या दोन्ही बाजूने बसण्यासाठी मोकळी जागा असेल .
 
 
दुसरी समस्या म्हणजे लेफ्टी असल्यामुळे पेशंटचे काम करताना वेगळ्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे मान किंवा पाठीच्या स्नायूंचे दुखणे उद्भवणे हे लेफ्टी लोकांच्या बाबतीत जास्त होऊ शकतं.
 
 
 
 
क्रिकेटमध्ये  लेफ्टी किंवा रायटी असण्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती असतं पण  डेंटिस्ट्री मधली ही डावी बाजू समजून घेताना तुम्हाला कसं वाटलं?
 
 
 
 

 

 

 

 

 

 

 

0 Comments