भारतातल्या पहिल्या महिला डेंटिस्ट बनण्याचा मान विमला सूद यांच्याकडे जातो. आपण आधीच्या ज्या दोन स्त्रियांची कथा ऐकली, त्यांचा डेंटिस्ट बनण्याचा मार्ग खडतर होता ;पण सुदैवाने बिमला सूद  यांचा जन्म बरेच डॉक्टर्स असलेल्या घरात झाला होता व त्यांच्या भावानेच त्यांना हा अभ्यासक्रम घेण्याविषयी सुचवले .
30 जणांच्या वर्गात एकटीच मुलगी असलेल्या विमला यांना शिक्षक व बाकीच्या विद्यार्थ्यांकडून देखील उत्तेजन मिळाले व 1944 साली लाहोरच्या डेंटल कॉलेजमधून पदवी घेऊन त्या बाहेर पडल्या . त्यानंतर त्यांनी अमेरिकेत इंटर्नशिप केली. 1955 साली त्यांनी लहान मुलांच्या दातांची विशेषज्ञ (paediatric dentist) हा पदवीधर अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. फाळणीनंतर भारतात राहून त्यांनी बरेच वर्षे  कॉलेजमध्ये सेवा दिली.
 
 
आज जगभरामध्ये महिला डेंटिस्ट चे प्रमाण 30% पेक्षा जास्तच आहे फिनलँड मध्ये तर चार पैकी तीन डेंटिस्ट्र स्त्रिया  असतात .
भारताबद्दल बोलायचं झालं तर डेंटल कॉलेजेस मध्ये विद्यार्थिनींची संख्या 50 ते 60 टक्के आहे.
 
माझ्यासारख्या डेंटिस्ट स्त्रियांसाठीचा मार्ग सुकर करणाऱ्या या काही महिला डेंटिस्टना सलाम…..
 
-सर्व माहिती गूगल वरुन साभार