हिरड्यांची काळजी घेणारी शाखा Periodontology
जेव्हा डेंटिस्ट्री शिकत होते तेव्हा या कोर्स बद्दल कुतुहलाने बरेच नातेवाईक चौकशी करायचे. जेव्हा मी त्यांना बीडीएस(BDS) नंतर पुढच्या स्पेशलायझेशनसाठी म्हणजे एमडीएस (MDS)साठी सात-आठ शाखा असतात; असं सांगायचे तेव्हा त्यांची प्रतिक्रिया असायची की “एवढेसे दात आणि तोंड आणि त्याच्यात स्पेशलायझेशनच्या एवढ्या शाखा?”
डेंटिस्टला आपण दाताचे डॉक्टर जरी म्हणत असलो; तरी फक्त दात हे डेंटिस्टचे कार्यक्षेत्र नाही, तर दातांना सांभाळणाऱ्या हिरड्यांच्या आजारांचा इलाज करण्याचे काम पण डेंटिस्टचे असते. हिरड्यांच्या आजारांबद्दलच्या पेरिओडोंटोलॉजी या शाखेबद्दल आपण माहिती घेऊ.
पेरिओडोंटिस्ट कोणाला म्हणतात?
बीडीएस नंतर हिरड्यांच्या आजारांवरती विशेष प्रशिक्षण घेणाऱ्या डेंटिस्टना ‘पेरिओ डोंटिस्ट’ असे म्हणतात.
कसे होतात हिरड्यांचे आजार?
यासाठी आधी प्लाक आणि टार्टर म्हणजे काय ते समजून घ्यावे लागेल
आपण खाल्लेले अन्न व लाळ यांच्यातील घटकांपासून तोंडातले जंतू प्लाक नावाचा मऊ थर दातावर जमा करतात. तो डोळ्यांना दिसतही नाही पण नियमित ब्रशींगने स्वच्छ होऊ शकतो
हा थर स्वच्छता न झाल्याने किंवा इतर काही कारणाने जर कडक झाला तर त्याला टार्टर असे म्हणतात. हा नुसत्या ब्रशिंगने निघत नाही व हाच थर हिरड्यांच्या आजारांना कारणीभूत ठरतो.
जिन्जिवायटिस (gingivitis) ही हिर हिरड्यांच्या आजाराची पहिली पायरी असते यात मुख्यत्वे हिरड्यातून रक्त येणे , हिरड्या सुजणे, तोंडातून दुर्गंधी येणे ही लक्षणे दिसतात
पेरियोडोंटायटिस (Periodontitis)
याला पायोरिया असंही म्हटलं जातं
यात हिरड्यांबरोबरच दातांचा आधार असलेल्या हाडाला देखील इन्फेक्शन ची लागण होते त्यामुळे दात ढिले पडणे, दात हलणे ही लक्षणे देखील दिसतात.
हिरड्यांच्या आजारांवर उपचार काय?
दातांचे क्लिनिंग-
यात दातांचा वर व हिरड्याजवळ तयार झालेला ट्रॅक्टरचा थर मशीनने स्वच्छ केला जातो हा त्रासदायक थर गेल्यानंतर हिरड्यांची सूज जाऊन त्या पूर्ववत होऊ शकतात
हिरड्यांच्या शस्त्रक्रिया-
यात इन्फेक्शन हिरड्यांच्या खाली पोहोचलेले असल्यामुळे हिरड्यांची खोलवर स्वच्छता केली जाते. गरज पडल्यात आता औषधे/ग्राफ्ट ठेवला जातो.
कसे टाळावेत हिरड्यांचे आजार?
- दिवसातून दोन वेळा नियमित ब्रश करणे
- हिरड्यांना मसाज करणे
- गरज असल्यास फ्लॉसींग (flossing ) करणे
- दर सहा महिन्यांनी दातांचे तपासणी करून घेणे
|
|
.
|
ReplyForward |
ऍडजेस्टमेंट करावी लागायची. तसेच अशा मुलांना प्रोफेसरच अशी शिकवण द्यायचे की, ” बाहेर गेल्यावरती तुम्ही जेव्हा डेंटल क्लिनिकमध्ये जॉब शोधाल तेव्हा तुम्हाला अशी वेगळ्या पद्धतीची चेअर मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच्या डेंटल चेअर वरती ऍडजेस्टमेंट करून काम कसं करायचं याची प्रॅक्टिस कॉलेजमध्येच करून घ्या “
तसेच बऱ्याचदा स्वतःच्या क्लिनिकमध्ये सुद्धा अशी लेफ्टी चेअर ठेवणे डेंटिस्टना जमत नाही कारण, क्लिनिक मध्ये येणारे स्पेशालिस्ट किंवा असोसिएट डेंटिस्ट हे लेफ्टी असतीलच असं नाही.या समस्येला पर्याय म्हणून डेंटल चेअर च्या दोन्ही बाजूंनी काम करता येईल अशा लवचिक ॲम्बीडेक्सट्रस चेअर उपलब्ध आहेत पण त्यासाठी डेंटल क्लिनिकच्या जागेची रचना देखील पूरक असली पाहिजे, जिथे डेंटल चेअरच्या दोन्ही बाजूने बसण्यासाठी मोकळी जागा असेल .
दुसरी समस्या म्हणजे लेफ्टी असल्यामुळे पेशंटचे काम करताना वेगळ्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे मान किंवा पाठीच्या स्नायूंचे दुखणे उद्भवणे हे लेफ्टी लोकांच्या बाबतीत जास्त होऊ शकतं.
क्रिकेटमध्ये लेफ्टी किंवा रायटी असण्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती असतं पण डेंटिस्ट्री मधली ही डावी बाजू समजून घेताना तुम्हाला कसं वाटलं?
|
ReplyForward
|

0 Comments