डॉक्टर आनंदी गोपाळ जोशी या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर ! त्यांनी डॉक्टर बनण्यासाठी किती खस्ता खाल्ल्या , हे आपण पुस्तके किंवा चित्रपटातून ऐकलेलेच आहे . ज्या काळी बायकांनी साधं प्राथमिक शिक्षण घेणं, शाळेत जाणं हे देखील अजिबात समाजमान्य नव्हतं त्या काळात त्यांनी प्राथमिक, माध्यमिक शिक्षणापर्यंत मर्यादित न राहता थेट अमेरिकेत जाऊन डॉक्टरची डिग्री मिळवून दाखवली; मार्गातल्या अनंत अडचणी पार करून….
सहा मार्च जागतिक डेंटिस्ट दिवस व आठ मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने आपण डेंटिस्ट्री मधल्या स्त्रियांबद्दल बोलूया..
एमेलिन रॉबर्ट जोन्स
जगातली पहिली प्रॅक्टिसिंग डेंटिस्ट म्हणून यांचं नाव इतिहासात सापडतं. त्यांची या क्षेत्रातील कहाणी देखील रंजक आहे.
1860 च्या दशकात त्यांचे लग्न रॉबर्ट जोन्स या डेंटिस्टशी झालं . त्या काळात “डेंटिस्ट्री हे बायकांचं काम नाही “अशी ठाम समजूत होती व याबाबत एका प्रतिष्ठित डेंटिस्टचे असे विधान मेडिकल जर्नल मध्ये छापूनदेखील आले होते.
एमेलेन यांनी आपल्या नवऱ्याचे काम शिकण्यामध्ये रुची दाखवली पण त्यांच्या नवऱ्याची ही अशी ठाम समजूत होती की “त्यांच्या नाजूक हातांना हे काम जमणार नाही” तेव्हा नवऱ्याच्या नकळत काढलेल्या दातांवर सराव करून एमेले यांनी आपल्या नाजुक हातांचे कसब त्यांना दाखवले ; तेव्हा त्यांच्या नवऱ्याने त्यांना आपले काम शिकवण्यास सुरुवात केली. त्यानंतर एमेलेन यांनी डॉक्टर रोबर्ट हयात असताना व त्यांच्या मृत्यूनंतर (1865) देखील बरेच वर्ष एमिलिन यांनी दवाखाना चालवला तसेच अमेरिकाभर फिरून फिरत्या डेंटल चेअर मध्ये लोकांना सेवा पुरवली.
लुसी हॉब्स टेलर
1866 मध्ये लुसी यांनी डेंटल डिग्री प्राप्त केली.असे करणाऱ्या त्या जगातल्या पहिल्या महिला बनल्या.
पण इथपर्यंतचा मार्ग सोपा निश्चितच नव्हता. लहानपणी आई वडिलांचे छत्र हरपल्यामुळे त्यांनी नोकरी करून आपल्या भावंडांचा सांभाळ केला. पुढे त्यांना वैद्यक क्षेत्रात रुची निर्माण झाली; पण केवळ स्त्री असल्यामुळे त्यांना दोन मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. पण त्यांनी जिद्द न सोडता त्या प्रयत्न करत राहिल्या व 861 साली त्यांचा डेंटिस्ट्री शिकण्याचा प्रवास सुरू झाला व 1866साली त्यांना डेंटिस्ट ची पदवी प्राप्त झाली.
विमला सूद
भारतातल्या पहिल्या महिला डेंटिस्ट बनण्याचा मान विमला सूद यांच्याकडे जातो. आपण आधीच्या ज्या दोन स्त्रियांची कथा ऐकली, त्यांचा डेंटिस्ट बनण्याचा मार्ग खडतर होता ;पण सुदैवाने बिमला सूद यांचा जन्म बरेच डॉक्टर्स असलेल्या घरात झाला होता व त्यांच्या भावानेच त्यांना हा अभ्यासक्रम घेण्याविषयी सुचवले .
30 जणांच्या वर्गात एकटीच मुलगी असलेल्या विमला यांना शिक्षक व बाकीच्या विद्यार्थ्यांकडून देखील उत्तेजन मिळाले व 1944 साली लाहोरच्या डेंटल कॉलेजमधून पदवी घेऊन त्या बाहेर पडल्या . त्यानंतर त्यांनी अमेरिकेत इंटर्नशिप केली. 1955 साली त्यांनी लहान मुलांच्या दातांची विशेषज्ञ (paediatric dentist) हा पदवीधर अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. फाळणीनंतर भारतात राहून त्यांनी बरेच वर्षे कॉलेजमध्ये सेवा दिली.
आज जगभरामध्ये महिला डेंटिस्ट चे प्रमाण 30% पेक्षा जास्तच आहे फिनलँड मध्ये तर चार पैकी तीन डेंटिस्ट्र स्त्रिया असतात .
भारताबद्दल बोलायचं झालं तर डेंटल कॉलेजेस मध्ये विद्यार्थिनींची संख्या 50 ते 60 टक्के आहे.
माझ्यासारख्या डेंटिस्ट स्त्रियांसाठीचा मार्ग सुकर करणाऱ्या या काही महिला डेंटिस्टना सलाम…..
-सर्व माहिती गूगल वरुन साभार
लेफ्टि डेंटिस्ट ना डेंटल चेअरच्या डाव्या बाजूला काम करावे लागते जिथे जवळच पेशंटला थुंकण्या साठीचे छोटे बेसिन असते.लेफ्टी डेंटिस्ट साठी वेगळी रचना असलेली डेंटल चेअर सुद्धा असते पण डेंटिस्ट जिथे शिक्षण घेतात त्या डेंटल कॉलेज मध्ये बऱ्याचदा अशी वेगळी चेअर उपलब्ध नसते.माझ्या एका लेफ्टी डेंटिस्ट मैत्रिणीचा अनुभव होता की, त्यांच्या कॉलेजमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला एक अशी चेअर उपलब्ध होती पण तिच्या वर्गात दोन लेफ्टी विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या पैकी एकाला
0 Comments