डार्क की व्हाइट ? कसे असते दातांसाठी चॉकलेट?

by | Feb 3, 2023

क्लिनिक मध्ये आलेल्या लहान मुलां बद्दल त्यांचे आई-वडील  म्हणतात की, ” हा किंवा ही खूप चॉकलेट खाते. हिला समजावा , त्याने दात किडतात म्हणून” किंवा काहीजण म्हणतात की, ” मी तर बिलकुल चॉकलेट खात नाही तरी सुद्धा दात कसे काय  किडले ?”
चॉकलेटने दात किडतात  हे समीकरण लोकांच्या डोक्यात पक्कं बसलेलं  आहे पण हे समीकरण शंभर टक्के बरोबर आहे का?
आणि फक्त चॉकलेटच दात किडवणारा व्हिलन आहे का? की मुलांना आवडीचे इतरही काही पदार्थ दातांसाठी घातक आहेत?
 
फक्त चॉकलेटच दात किडवणारा व्हिलन आहे का? की मुलांना आवडीचे इतरही काही पदार्थ दातांसाठी घातक आहेत? 
 
 
 
मुलांना आवडणारा चॉकलेट हे मिल्क चॉकलेट असतं 20 ते 30 टक्के कोको पावडर आणि बाकी दूध पावडर व साखर असते व चॉकलेट मधली हीच साखर मुलांच्या दातांसाठी हानिकारक असते .
दिवसभरात अधून मधून  चॉकलेट खाणे, त्यानंतर चूळ न भरणे या गोष्टींमुळे चॉकलेट मधली साखर दातांवर तशीच राहून जाते आणि मग त्यामुळे दात किडायला मदत होते आणि जर चॉकलेट चिकट असेल तरी प्रक्रिया अजून वेगाने होते.

 

याउलट डार्क चॉकलेट मध्ये 70% जवळपास कोको पावडर असते तसेच डार्क चॉकलेट मध्ये पॉलिफिनोल्स म्हणून एक घटक असतो जो बॅक्टेरिया च्या वाढीला अटकाव करतो तसेच मुळे दात किडण्याची प्रक्रिया मंदावते डार्क चॉकलेट मध्ये अजूनही काही अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरासाठी व दातांसाठी चांगले असतात.
 
  त्यामुळे खरं बघायला गेलं तर डार्क चॉकलेट हे दातांसाठी आणि शरीरासाठी चांगलं असतं
 
आणि बाकीचे काही पदार्थ जे दातांसाठी भरपूर हानिकारक असतात पण लोकांना त्याची कल्पनाही नसते असा आपल्या रोजच्या जीवनातला पदार्थ म्हणजे बिस्किट …
बिस्किटांमध्ये जास्त प्रमाणात साखर तर असतेच जास्त प्रमाणात मैदासुद्धा असतो या दोन्ही गोष्टींचे खूप लवकर विघटन करून बॅक्टेरिया ऍसिड तयार करतात व या ऍसिड मुळेच दातांमध्ये कीड लागण्याची शक्यता वाढते.
याशिवाय  केक ,डोनट, आर्टिफिशल फ्रूट ज्यूस, फ्लेवर दूध, कोल्ड्रिंक्स या सर्वांमधील जास्त साखर दातांना हानिकारक असते.
तेव्हा पुढच्या वेळी एकट्या चॉकलेट वर आळ घेण्याआधी विचार करा.

 

 

 

 

 

 

0 Comments