इंटरसेप्टिव ऑर्थोडॉण्टिक्स
अशी म्हण आहे की “A stitch in time, saves nine ” म्हणजे एखादा प्रॉब्लेम नुकताच सुरू झालेला असताना त्याच्यावर उपाययोजना केल्या तर पुढे ती समस्या वाढत नाही. मोठ्या समस्येपेक्षा छोट्या समस्येचा इलाज हा कायम सोपा असतो . याच मुद्द्यावर आधारित आहे ऑर्थोडॉण्टिक्सची एक शाखा जिचे नाव आहे इंटरसेप्टिव ऑर्थोडॉण्टिक्स .
इंटरसेप्टिव ऑर्थोडॉन्टिक्स म्हणजे काय ?
शक्यतो सर्व पक्के दात आल्यानंतर म्हणजे बारा ते तेरा वर्षे वयानंतर ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट केली जाते
पण मुलांचे दात येत असतानाच जर असे लक्षात आले की काही कारणाने पक्के येणारे दात वेडेवाकडे येऊ शकतात; तर लहान वयातच योग्य वेळी काही उपायोजना करून भविष्यातल्या orthodontic ट्रीटमेंट ची गरज टाळली जाऊ शकते किंवा orthodontic ट्रीटमेंट ची गरज पडली तर तिला लागणारा वेळ हा कमी केला जाऊ शकतो किंवा orthodontic ट्रीटमेंट नंतर स्माइल जास्त खुलून येऊ शकते .
ही ट्रीटमेंट साधरण ७ ते १२ या वयात केली जाते.
यात केल्या जाणाऱ्या काही treaatments ची माहिती घेऊया
दुधाच्या दातांची काळजी –
दुधाचे दात हे फक्त चावणे आणि बोलणे या कामासाठीच लहान मुलांना उपयोगी नसतात तर ते पक्क्या दातांची जागा पण सांभाळून ठेवतात त्यामुळे दुधाचे दात शक्यतो वाचवणे महत्त्वाचे असते.
काही कारणाने दुधाचा दात काढावा लागलाच ;तर तिथे पक्क्या दाताची जागा सांभाळून ठेवण्यासाठी एक स्पेस मेंटेनर लावला तर तिथे शेजारचे दात सरकून पक्क्या दाताला यायला जागा न उरणे व वाकडा येणे अशी समस्या उद्भवत नाही.
दात काढणे
दुधाचे दात वेळेच्या वेळी पडले नाहीत तर पक्क्या दाताला यायला जागा नसल्यामुळे तो वाकडा येतो.
ही गोष्ट वेळेवर लक्षात आली तर; दुधाचा दात स्वतःहून हलून पडत नसेल तर तो डेंटिस्ट काढतात. त्यामुळे भविष्यातला प्रॉब्लेम टाळला जाऊ शकतो.
वाईट सवयींवरती कंट्रोल
अंगठा चोखणे किंवा जीभ सारखी टाळूला लावणे (tongue thrust) , तोंडाने श्वास घेणे
यासारख्या काही चुकीच्या सवयींमुळे देखील दात पुढे येण्याची समस्या उद्भवते . मुलांना समजावून जर या सवयी सुटत नसतील तर त्यासाठी सगळे मोडण्यासाठीचे एक अप्लायन्स बनवून ती सवय वेळीच मोडावी लागते जेणेकरून दातांची रचना बिघडणार नाही
काही स्नायूंचे व्यायाम
दात त्यात पुढे येणे किंवा वाकडे येण्याला कधी कधीजीभ किंवा ओठ यांचे अपुरे किंवा जास्तीचे प्रेशर कारणीभूत असते.
हे देखील वेळीच लक्षात आलं तर जीभ आणि ओठाच्या स्नायूंचे काही व्यायाम करून दातांची रचना बिघडणं आपण थांबवू शकतो.
जबड्याच्या हाडांची वाढ आणि दाताची रचना
वरचा आणि खालचा जबडा यापैकी कुठल्याही एका जबड्याची वाढ किंवा जास्त झाली तरीसुद्धा दातांची रचना बिघडू शकते पण या हाडांच्या वाढीला योग्य ती दिशा देण्याचं काम हे वाढत्या वयातच करता येऊ शकतं म्हणजे (मुलींसाठी नऊ ते अकरा वर्षे व मुलांसाठी 11 ते 13 वर्षे) या वयात एखादा जबड्याची वाढ कमी होते आहे असं दिसलं;तर त्या जबड्याच्या वाढीला चालना देणं किंवा एखाद्या जबड्याची वाढ जास्त होते आहे असं वाटलं,तर त्याला कण्ट्रोल करणे अशा उपाययोजना करता येऊ शकतात.
ही काही इंटरसेप्टिव ऑर्थोडॉण्टिक्स मध्ये करण्यात येणाऱ्या ट्रीटमेंट ची उदाहरणे या खेरीजही अनेक प्रकारच्या उपाययोजना उपलब्ध आहेत पण महत्त्वाचा मुद्दा असा , की ही समस्या लवकरात लवकर ओळखणं व त्यासाठी मुलांचे नियमित डेंटल चेकअप खूप महत्त्वाचे आहे
.
|
ReplyForward |
ऍडजेस्टमेंट करावी लागायची. तसेच अशा मुलांना प्रोफेसरच अशी शिकवण द्यायचे की, ” बाहेर गेल्यावरती तुम्ही जेव्हा डेंटल क्लिनिकमध्ये जॉब शोधाल तेव्हा तुम्हाला अशी वेगळ्या पद्धतीची चेअर मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच्या डेंटल चेअर वरती ऍडजेस्टमेंट करून काम कसं करायचं याची प्रॅक्टिस कॉलेजमध्येच करून घ्या “
तसेच बऱ्याचदा स्वतःच्या क्लिनिकमध्ये सुद्धा अशी लेफ्टी चेअर ठेवणे डेंटिस्टना जमत नाही कारण, क्लिनिक मध्ये येणारे स्पेशालिस्ट किंवा असोसिएट डेंटिस्ट हे लेफ्टी असतीलच असं नाही.या समस्येला पर्याय म्हणून डेंटल चेअर च्या दोन्ही बाजूंनी काम करता येईल अशा लवचिक ॲम्बीडेक्सट्रस चेअर उपलब्ध आहेत पण त्यासाठी डेंटल क्लिनिकच्या जागेची रचना देखील पूरक असली पाहिजे, जिथे डेंटल चेअरच्या दोन्ही बाजूने बसण्यासाठी मोकळी जागा असेल .
दुसरी समस्या म्हणजे लेफ्टी असल्यामुळे पेशंटचे काम करताना वेगळ्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे मान किंवा पाठीच्या स्नायूंचे दुखणे उद्भवणे हे लेफ्टी लोकांच्या बाबतीत जास्त होऊ शकतं.
क्रिकेटमध्ये लेफ्टी किंवा रायटी असण्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती असतं पण डेंटिस्ट्री मधली ही डावी बाजू समजून घेताना तुम्हाला कसं वाटलं?
|
ReplyForward
|

0 Comments