+91 7020877432

Above Bank Of Maharashtra, Anandi Plaza , 1st Floor, Sus, Pune, 411021

  • Follow
  • Follow
  • Follow
  • Home
  • About Sonrisa
    • About Us
    • About Dr. Prajakta’s
  • Our Services
    • Root Canal
    • Dentures
    • Dental Implants
    • Kids Dentistry
    • Bridges & Crowns
    • Teeth Whitening
    • Braces & Aligners
    • Wisdom Teeth Removal
    • Dental Fillings
  • Smile Gallery
  • Testimonials
  • FAQ’s
  • Blog
  • Contact Us
Book An Appointment

Orthodontic ट्रीटमेंटची कमाल

by Sonrisa | Jul 6, 2024

 

 

“माझे दात पुढे असल्यामुळे मला शाळेत असताना चार लोकांसमोर काही बोलायची लाज वाटायची. मला असं वाटायचं की,  माझ्या  दातांची मस्करी उडवली जाईल. पण माझी ब्रेसेसची ट्रीटमेंट झाल्यावर , माझ्या नवीन स्माईल सोबत मला जणू नवा कॉन्फिडन्स मिळाला”

 हे शब्द आहेत माझ्या एका मैत्रिणीचे जिने शाळेत असताना केलेल्या ब्रेसेसच्या ट्रीटमेंट नंतर स्वतःच्या व्यक्तीमत्वात एक मोठा बदल अनुभवला

दात पुढे असणे किंवा वेडेवाकडे असणे, दातात फटी असणे या सर्वांसाठी ब्रेसेस किंवा दाताला तार लावणे अर्थात ओर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट  बऱ्याच वर्षांपासून केली जाते; पण आजकालच्या मोबाईल कॅमेरा व सेल्फीच्या युगात स्वतःच्या स्माईलबद्दल लोक खूप जागरूक झाले आहेत त्यामुळे या ट्रीटमेंटबद्दल बरीच जागरूकता निर्माण झाली आहे याशिवाय या क्षेत्रात उतरलेल्या काही कंपन्यांच्या जाहिरातींमुळे देखील बरेच लोक कुतूहलाने या ट्रीटमेंटबद्दल विचारतात; त्यामुळे या ट्रीटमेंटची थोडी माहिती करून घेऊया.
 
 
 
 
 
दातांना ब्रेसेसची गरज का असते?
 दात जेव्हा  वेडेवाकडे असतात किंवा पुढे असतात तेव्हा निश्चितच एखाद्या व्यक्तीच्या आत्मविश्वासावर परिणाम होतो. चार चौघांसमोर बोलताना,  आपल्या बोलण्यापेक्षा दातांकडेच लोकांचे लक्ष जाईल, ते आपली खिल्ली उडवतील का अशी अशा भीतीने लोक मन मोकळे हसणे सुद्धा टाळतात.
 या खेरीज वेड्यावाकडे दातांमुळे  नीट स्वच्छता न ठेवता आल्यामुळे दात लवकर किडण्याचा धोका असतो .
तसेच पुढे असलेले दात लवकर मार लागून तुटण्याचा धोका राहतो.
ट्रीटमेंटने स्माईल तर आकर्षक होतेच शिवाय दातांची रचना अशा पद्धतीची होते, जिची काळजी व्यवस्थित घेता येऊ शकते.
 
 
ही ट्रीटमेंट कधी घ्यावी?
 पूर्वी साधारण सर्व पक्के दात आल्यानंतर 13 ते 23 या वयोगटांमध्ये ही ट्रीटमेंट घेतली जात होती. त्यानंतरच्या वयामध्ये या ट्रीटमेंटच्या चांगले परिणाम दिसत नाहीत, असा गैरसमज होता. आता मात्र हिरड्यांचा अभ्यास करून ही ट्रीटमेंट अगदी  चाळीशी पर्यंतच्या लोकांना सुद्धा घेता येते.
 
कशी केली जाते ब्रेसेसची ट्रीटमेंट ?
ही ट्रीटमेंट शक्यतो या क्षेत्रातले तज्ञ डेंटिस्ट म्हणजे या क्षेत्रात मास्टरची डिग्री असलेले ऑर्थोडांटिस्ट करतात  ड्रेसेसचे साधारण खालील प्रकार सांगता येऊ शकतात-
 
1)मेटल ब्रेसेस-
 यात दातांची रचना बदलण्यासाठी त्यांना हळूहळू हलवलं जातं त्यासाठी दातांवर मेटल ब्रॅकेट्स व वायर लावलेले असते महिन्यातून एकदा वायर वरचे प्रेशर कमी जास्त करणे किंवा इतर विविध साधने वापरून दातांची रचना बदलून स्माईल सुंदर दिसेल याचा प्रयत्न केला जातो.
 
2)सिरॅमिक  ब्रेसेस –
ह्यातले ब्रॅकेट्स हे दाताच्या रंगाच्या असल्यामुळे पटकन दिसण्यात येत नाहीत पण या ब्रेसेस चे काम हे मेटल ब्रेसेस प्रमाणेच असते.
3)लिंग्वल ब्रेसेस
यात ब्रॅकेट्स हे दातांच्या दर्शनी बाहेरच्या भागावर न लावता आतल्या बाजूने लावले जातात त्यामुळे ते पटकन  दिसण्यात येत नाहीत पण या प्रकारच्या ब्रेसेस् मधे जिभेला ऍडजेस्ट व्हायला बऱ्यापैकी त्रास होतो
4)आलायनर
तंत्रज्ञान क्षेत्रातील स्कॅनिंग आणि थ्रीडी प्रिंटिंग या प्रगतीमुळे किचकट अशा  ब्रेसेस ऐवजी वापरायला सुटसुटीत व जवळपास अजिबात दिसून न येणाऱ्या अलायनर चे युग सध्या ओर्थोडॉन्टीक क्षेत्रामध्ये आले आहे. तसेच या क्षेत्रात उतरलेल्या विविध कंपन्यांच्या स्पर्धेमुळे लायनर चा खर्च देखील आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे
 
ट्रीटमेंट ला वेळ किती लागतो?
 ट्रीटमेंट ला लागणारा वेळ हा प्रत्येक व्यक्तीच्या दातांच्या रचनेवर अवलंबून असतो तरीदेखील साधारणपणे बारा महिने ते 36 महिने अर्थात एक वर्ष ते तीन वर्षे वेळ लागू शकतो
 
ह्या ट्रीटमेंट बद्दल अजून काही माहिती पुढील भागात.. 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

ReplyForward

 
Add reaction
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

लेफ्टि डेंटिस्ट ना डेंटल चेअरच्या डाव्या बाजूला काम करावे लागते जिथे जवळच पेशंटला थुंकण्या  साठीचे छोटे बेसिन असते.लेफ्टी डेंटिस्ट साठी वेगळी  रचना असलेली डेंटल चेअर सुद्धा असते पण डेंटिस्ट जिथे शिक्षण घेतात त्या डेंटल कॉलेज मध्ये बऱ्याचदा अशी वेगळी चेअर उपलब्ध नसते.माझ्या एका लेफ्टी डेंटिस्ट मैत्रिणीचा अनुभव होता की, त्यांच्या कॉलेजमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटला एक अशी चेअर उपलब्ध होती पण तिच्या वर्गात दोन लेफ्टी विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या पैकी एकाला

 

 
 ऍडजेस्टमेंट करावी लागायची. तसेच अशा मुलांना प्रोफेसरच अशी शिकवण द्यायचे की, ” बाहेर गेल्यावरती तुम्ही जेव्हा डेंटल क्लिनिकमध्ये जॉब शोधाल तेव्हा तुम्हाला अशी वेगळ्या पद्धतीची चेअर मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच्या डेंटल चेअर वरती ऍडजेस्टमेंट करून काम कसं करायचं याची प्रॅक्टिस कॉलेजमध्येच करून घ्या “
तसेच बऱ्याचदा स्वतःच्या क्लिनिकमध्ये सुद्धा अशी लेफ्टी चेअर    ठेवणे डेंटिस्टना जमत नाही कारण, क्लिनिक मध्ये येणारे स्पेशालिस्ट किंवा असोसिएट डेंटिस्ट हे लेफ्टी असतीलच असं नाही.या समस्येला पर्याय म्हणून डेंटल चेअर च्या  दोन्ही बाजूंनी काम करता येईल अशा लवचिक ॲम्बीडेक्सट्रस  चेअर उपलब्ध आहेत पण त्यासाठी डेंटल क्लिनिकच्या जागेची रचना देखील पूरक असली पाहिजे, जिथे डेंटल चेअरच्या दोन्ही बाजूने बसण्यासाठी मोकळी जागा असेल .
 
 
दुसरी समस्या म्हणजे लेफ्टी असल्यामुळे पेशंटचे काम करताना वेगळ्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे मान किंवा पाठीच्या स्नायूंचे दुखणे उद्भवणे हे लेफ्टी लोकांच्या बाबतीत जास्त होऊ शकतं.
 
 
 
 
क्रिकेटमध्ये  लेफ्टी किंवा रायटी असण्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती असतं पण  डेंटिस्ट्री मधली ही डावी बाजू समजून घेताना तुम्हाला कसं वाटलं?
 
 
 
 
ReplyForward

 

 

 

 

 

 

 

0 Comments

Reach Us

+91 7020877432

contact@sonrisa-smiles.com

Above Bank Of Maharashtra, Anandi Plaza, 1st Floor, Sus, Pune, 411021

  • Follow
  • Follow
Useful Links
Home
About Us
Treatments
Gallery
Contact Us
Opening Hours
Mon – Sat : 10.00AM To – 01.00PM
Mon – Sat : 05.00PM To – 08.00PM
Sunday : Close
Map
All rights reserved 2021| Designed by sarvottam