स्पोर्ट्स dentistry
2004 च्या अथेन्स olympic मध्ये फिजिओथेरपिस्ट खालोखाल ज्या डॉक्टरांच्या सेवांना मागणी होती; ते होते डेंटिस्ट
2012 च्या लंडन ऑलिंपिकमध्ये जवळपास एक पंचमांश (1/5th) athletes ना दातांच्या समस्यांनी त्रस्त केले होते.
कल्पना करा की , एखादा देशाचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू ; ज्याच्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं ; तो दाताच्या कुठल्या समस्येमुळे सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही तर काय होईल?
सध्या सर्व जगात ऑलिम्पिक खेळांची धूम सुरू आहे त्या अनुषंगाने नव्याने उदयास येणाऱ्या स्पोर्ट्स डेंटिस्ट्री ह्या खेळाशी संबंधित डेंटिस्ट्रीच्या शाखे बद्दल माहिती घेऊया.
या शाखेचे मुख्य ध्येय आहे की ‘कुठलीही दातांची समस्या ही सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या आड येऊ नये.’
या शाखेमध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो:-
1)खेळाडूंचे दंत आरोग्य हे चांगले राखणं
2)खेळताना होणाऱ्या तोंडाशी संबंधित दुखापती टाळणे
3)दुखापती झाल्यास त्यांना योग्य पद्धतीने मॅनेज करणे
4) खेळाडू त्यांचे कोच व त्यांच्याशी संबंधित इतर सर्वांना दातांच्या आरोग्याबाबत जागृत करणे
कुठल्याही खेळामध्ये चेहरा आणि दातांना इजा होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. तब्बल 11 ते 40 टक्के क्रीडा जगतातल्या दुखापती चेहऱ्याशी संबंधित असतात.
दुखापतींची कारणे-
1)अपघात
2)योग्य इक्विपमेंट किंवा प्रोटेक्शन नसणे
3)ट्रेनिंग किंवा वार्म-अपच्या चुकीच्या पद्धती
खालील क्रीडा प्रकारांमध्ये दुखापतींची शक्यता सगळ्यात जास्त असते –
1)बॉक्सिंग ,ज्युदो सारखे contact स्पोर्टस्
2)हॉकी, बास्केटबॉल ,फुटबॉल
3)मोटर बाईक शी संबंधित क्रीडा प्रकार
चेहऱ्याशी संबंधित दुखापती टाळण्यासाठी चेहऱ्याचे संरक्षण करणाऱ्या खालील गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत-
1) हेल्मेट,
2)फेस मास्क
3)माऊथ गार्ड
यापैकी तोंड व दाताला इजा टाळण्यासाठी वापरला जाणाऱ्या ‘माऊथ गार्ड ‘ बद्दल आपण सविस्तर माहिती घेऊ :-
” चक दे इंडिया “या लोकप्रिय चित्रपटामध्ये अर्जेंटिनाची टीम दाखवताना आडदांड मुलींची टीम तोंडात रंगीत काहीतरी घातलेली दाखवली गेली आहे; त्यांच्या तोंडातल्या त्या डिवाइसलाच ‘माऊथ गार्ड’ असे म्हणतात.
माऊथगार्डचे फायदे:-
1)तोंडातील जीभ ओठ हिरड्या या नाजूक भागांचे संरक्षण
2)दातांचे संरक्षण
3)खालच्या जबड्याचे फ्रॅक्चर किंवा डिसलोकेशन म्हणजे जबडा निखळणे ह्या गोष्टी टाळणे
4) खालच्या जबड्याला खूप जोरात मार लागल्यास कवटीच्या खालच्या बाजूला इजा होऊन मेंदूलाही इजा होऊ शकते हे माऊथ गार्ड मुळे टाळले जाते.
त्यामुळे अगदी लहान वयापासूनच वेगवेगळे खेळ खेळणाऱ्या मुलांना व त्यांच्या कोचना हे सर्व संरक्षण करणारे डिव्हायसेस वापरण्याबद्दल जागरूक करणे महत्त्वाचे आहे.
|
ReplyForward |
.
|
ReplyForward |
ऍडजेस्टमेंट करावी लागायची. तसेच अशा मुलांना प्रोफेसरच अशी शिकवण द्यायचे की, ” बाहेर गेल्यावरती तुम्ही जेव्हा डेंटल क्लिनिकमध्ये जॉब शोधाल तेव्हा तुम्हाला अशी वेगळ्या पद्धतीची चेअर मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही नेहमीच्या डेंटल चेअर वरती ऍडजेस्टमेंट करून काम कसं करायचं याची प्रॅक्टिस कॉलेजमध्येच करून घ्या “
तसेच बऱ्याचदा स्वतःच्या क्लिनिकमध्ये सुद्धा अशी लेफ्टी चेअर ठेवणे डेंटिस्टना जमत नाही कारण, क्लिनिक मध्ये येणारे स्पेशालिस्ट किंवा असोसिएट डेंटिस्ट हे लेफ्टी असतीलच असं नाही.या समस्येला पर्याय म्हणून डेंटल चेअर च्या दोन्ही बाजूंनी काम करता येईल अशा लवचिक ॲम्बीडेक्सट्रस चेअर उपलब्ध आहेत पण त्यासाठी डेंटल क्लिनिकच्या जागेची रचना देखील पूरक असली पाहिजे, जिथे डेंटल चेअरच्या दोन्ही बाजूने बसण्यासाठी मोकळी जागा असेल .
दुसरी समस्या म्हणजे लेफ्टी असल्यामुळे पेशंटचे काम करताना वेगळ्या पोझिशनमध्ये बसल्यामुळे मान किंवा पाठीच्या स्नायूंचे दुखणे उद्भवणे हे लेफ्टी लोकांच्या बाबतीत जास्त होऊ शकतं.
क्रिकेटमध्ये लेफ्टी किंवा रायटी असण्याबद्दल आपल्याला भरपूर माहिती असतं पण डेंटिस्ट्री मधली ही डावी बाजू समजून घेताना तुम्हाला कसं वाटलं?
|
ReplyForward
|

0 Comments