व्यसन मुक्तीकडे …

by | Oct 6, 2021

मागच्या भागात आपण तंबाखूचे दुष्परिणाम पाहिले , या भागात आपण या व्यसनातून बाहेर पडण्याबद्दल बघू ..

तंबाखूचे व्यसन सर्व सामाजिक थरांत खोलवर पसरलेले आहे, याचे मुख्य कारण

  1. तंबाखूच्या खरेदी, विक्री किंवा सार्वजनिक ठिकाणी वापरावर कायद्याने बंदी नाही
  2. तंबाखू सगळीकडे सहजपणे मिळतो
तंबाखू मधील निकोटीन हा व्यसनाला कारणीभूत ठरणारा मुख्य पदार्थ आहे. तंबाखू सोडताना शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर त्रास जाणवतो . तरीदेखील तंबाखूचे, तो सेवन करणाऱ्या व्यक्तीवर व समाजावर होणारे दुष्परिणाम बघता ही व्यसन सोडण्यासाठी प्रयत्न करणे केव्हाही चांगले .
तंबाखू चे व्यसन सोडण्यासाठी अमेरिकन कॅन्सर सोसायटीने सुचवलेल्या टिप्स खालीलप्रमाणे-
१. व्यसन सोडण्याचा दिवस आणि तारीख ठरवा
  • या दिवसाबद्दल सर्वांना सांगा
  • सर्व सिगारेटस , तंबाखू, गुटखा पाकिटे फेकून द्या
  • या दिवशी स्वतःला busy ठेवा
  • व्यसनी लोकांची संगत टाळा
  • भरपूर पाणी,सरबत वगैरे द्रव पदार्थ प्या
२. NRT अर्थात निकोटीन replacement थेरपी
कमी प्रमाणात निकोटीन असणारे chewing gum , patch ,स्प्रे यांचा यात समावेश होतो. ह्यांच्या वापरामुळे निकोटीन किंवा तंबाखू थांबवल्यामुळे दिसणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासांचे प्रमाण कमी होते , तसेच
तंबाखूची तल्लफ कमी होण्यास ही मदत होते
३. औषधे
डॉक्टरांच्या सल्ल्याने Bupropion , किंवा Varinicline अशी काही औषधे घेतंतली जाऊ शकतात.
४. मानसिक आधार
support group (मदत गट ) किंवा तज्ञांचे मार्गदर्शन हे ह्या व्यसना शी लढायला मानसिक पातळीवर मदत करतात . मदत गटामध्ये व्यसंन मुक्तीसाठी प्रयत्न करणारे तसेच या व्यसनातून यशस्वीपणे बाहेर पडलेल्यांचा समावेश असतो
५. पर्यायी उपचारपद्धती
यात योग ,ध्यान ,accupuncture , संमोहन यांचा समावेश होतो.

0 Comments